Photo Credit; instagram

NCP: पक्षही गेलं, चिन्हही गमावलं.. पाहा नेते पवारांबद्दल काय बोलले!

Photo Credit; instagram

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्ष हा अजित पवार गटाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Photo Credit; instagram

या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'शरद पवार हे फिनिक्स पक्षाप्रमाणे आहेत, ते स्वतःच्या जीवावर स्वतःच विश्व निर्माण करतील.'

Photo Credit; instagram

'ज्या लोकांना पवारांनी आमदार केले, खासदार केले मंत्री केले त्याच जवळच्या लोकांनी त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आहे.' अशी टीका आव्हाडांनी केली.

Photo Credit; instagram

तर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही ताकदीनं लढणार आहोत.'

Photo Credit; instagram

तर जयंत पाटीलही म्हणाले की, 'आम्ही लोकशाही मानणारे आहोत, त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय नम्रपणे स्वीकारतो मात्र या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ.'

Photo Credit; instagram

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  हा बहुमत आणि प्रतिज्ञापत्राच्या आधारावर अजित पवार गटाकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. 

Photo Credit; instagram

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत दिलेला निर्णय हा शिवसेनेप्रमाणेच आहे.

पुढील वेब स्टोरी

IAS Officer : IAS अधिकाऱ्यांनाही असतो बॉस?

इथे क्लिक करा